आयु. सुनील खोब्रागडे सर
आपल्या साहित्य विश्वात एकच प्रवाह आहे तो म्हणजे " आंबेडकरी साहित्य ". आजपर्यंत अकरा अ भा दलित साहित्य संमेलन झालीत व त्यानंतर पंधरा आंबेडकरी साहित्य संमेलन झालीत. सर्व संमेलनाच प्रेरणास्त्रोत बाबासाहेब आंबेडकरच आहेत. या पन्नास वर्षात कुणीही मराठी साहित्य संमेलनाचा ध्यास पकडला नाही. प्रस्थापितांच्या मराठी साहित्य विश्वाला पर्याय म्हणून सुरवातीला दलित व नंतर आंबेडकरी असं साहित्य विश्व निर्माण केल.
खोब्रागडे सर, तुम्ही उंदीर खावून जगलेत, आठव्या वर्गात असताना तुम्ही पहिल्यांदा पायात चप्पल घातली हाच विषय आपल्या साहित्य निर्मितीचा गाभा होता. पण असं दिसते कि असे लोक पैसेवाले झाले व सभोवताल चार लाभार्थी जमा झाले कि लगेच आपल नवं दुकान सुरु करतात व बहुजन, सर्वजनाची स्वप्नही पडायला लागतात आणि हे सर्व कपड्यांची क्रीझ मेंटेन करून करतात. त्यातलाच तुमचा मराठी साहित्य सभेचा उपद्रव दिसतो. तुम्ही आयोजित करीत असलेल संमेलन सर्वजनपदी असल्याच घोषित करून मायावती साठी महाराष्ट्रात जमीन तयार करण्याची तुमची मानसिकता सुद्धा सिद्ध झालेली आहे.
महाकवी वामनदादा कर्डक यांची एक गोष्ट सांगतो, १९९३ ला पहिल्या अ भा आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्वताविषयी फार अभिमानाने एक वाक्य उदगारल होत ते म्हणजे " मी फकीर आहे पण आंबेडकरवादी " तेव्हा खोब्रागडे सर तुमच्याकडे तर चार पैसे आलेत तर मग तुम्हाला स्वताला किंवा संमेलनाला आंबेडकरी म्हणवून घेण्यास कुठली अडचण येत आहे? म्हणजे येनकेन प्रकारे बहुजन,सर्वजन व शेवटी याच राजकारण असच न ! आणि असच आहे तेव्हा ओशो रजनीश, बसपा च उत्कृष्ट मिश्रण असलेले भाऊ लोखंडे तुमच्या संमेलनाचे अध्यक्ष होत असतील तर नवल कसलं ?
मायावतीन बाबासाहेबाच्या हत्तीचा गणेश केला, तुम्ही आता साहित्याचा ज्ञानेश्वर करायला निघालेत. हा उपद्रव बाबासाहेबांच्या २२ प्रतीज्ञांशी तडजोड नाही का ?
अधिकाऱ्यांची, उद्योगपतींची विना अनुभवाने आंदोलनात डायरेक्ट एन्ट्री झाली कि असे प्रदूषण येणारच.
No comments:
Post a Comment