आयु. सुनील खोब्रागडे जी,
दि. ३ व ४ एप्रिल २०११ रोजी तुमच्या अ. भा.मराठी साहित्य महासभेने आयोजित केलेल्या अ. भा. मराठी साहित्य संगीती चे अध्यक्ष भाऊ लोखंडे याचं भाषण आपल्या महानायक मधून प्रकाशीत झाले. सोबतच भाऊ लोखंडे च्या भाषणाचा सार सुद्धा महानायक मधून वाचायला मिळाला. या संगीतीच्या अध्यक्ष पदावरून बोलताना भाऊ लोखंडे बोललेत कि ' ज्या राज्यात अस्पृश्यांना स्वाभिमानाने जगता येत न्हवते, आज त्या राज्याच्या एका चांभार महिलेच्या जोड्याला चुम्बताना ब्राह्मणांना बघत आहोत ' हा चमत्कार नाही का ? असे असताना आजही सत्ताधाऱ्यांच्या मनातील जातीवाद गेला नाही'. भाऊच्या वरील वाक्यात महानायक ला संविधानिक मूल्य सापडलेत हा सुद्धा एक चमत्कार दिसतो आहे. मायावती मुख्यमंत्री आहे म्हणून ब्राह्मण जोडे चुम्ब्तात किंवा मायावती चांभाराची पोरगी आहे म्हणून तिचे जोडे चुंबत असतील, शेवटी प्रश्न निर्माण होतो तो जोडे चुम्ब्ण्याचा. एखाद्या मुख्य मंत्र्याची जात सांगण्याचा अधिकार तेहि जोड्याच चुंबन घेण्याच्या संदर्भात संविधानाच्या कुठल्या कलमात येतो याचा उल्लेख मात्र महानायक किंवा भाऊनी केला नाही.
पण सुनील जी असही असू शकते कि यु पी तले ब्राह्मण मायावतीकडून ब्रह्मा विष्णूचा नारा लावून घेतात आणि मिश्रा नावाच्या ब्राम्हणाला बसपा च्या मंचावरून जय परशुराम चा नारा लावण्याची संधी देतात म्हणून ब्राम्हण तिचे जोडे चुंबत असतील तरी सुद्धा शेवटी प्रश्न एकच उरतो तो म्हणजे " जोडे चुम्बण्याचा ". त्यासाठी बसपा वाल्यांना एवढ पिवळ होण्याची गरज काय? हि बाब किती संविधानिक आहे हे तुमच्या सारख्या प्रशासकीय अधिकारी राहलेल्या माणसाला कळू नये याला ' चमत्कार ' म्हणायचं कि ' राजकारण ' हे तुम्हीच ठरवावं पण राजकीय उद्देश मनाशी बाळगून संविधानिक मुल्यांवर साहित्य निर्मिती अशी जी काही मजाकबाजी तुम्ही सुरु केली ती मात्र निंदनीय आहे. या नंतर कोणत्याही रिपब्लिकन नेत्याला शिवा देण्याचा संविधानिक अधिकार जरी तुमच्याकडे असेल पण नैतिक अधिकार तुम्हाला आहे असे मला वाटत नाही. फक्त मायावती चार वेळा मुख्यमंत्री झाली म्हणून, किंवा खोब्रागडे न वृत्तपत्र सुरु केल म्हणून किंवा महानायक चळवळीतल्या माणसांना हजारो रुपयांचे पुरस्कार देतो म्हणून बसपा वाल्यांना शिवी देण्याचा अधिकार प्राप्त झाला असा जर कुणाचा गैरसमज होत असेल किंवा झाला असेल तर त्या माणसांनी अजून आंबेडकरी आंदोलन समजून घेण्याची आवश्यकता नक्कीच आहे.
सुनीलजी, बाबासाहेबांच्या काळात पैसेवाले लोक त्यांच्या पाठीशी उभे राहत. त्या नंतरच्याही काळात पैसेवाले लोक विचारवंतांच्या, कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून चळवळीला पाठींबा देत असायचे. पण कांशीराम नावाच्या बिमारीपासून समाजातील, चळवळीतील नितीनियमच लयास गेल्याचे निदर्शनास येत आहेत. चळवळी मध्ये दिवसेंदिवस चमत्कारच होत आहेत. याच नुकतच चांगल उदाहरण म्हणजे तुमच्या साहित्य संगीतीच अध्यक्षीय भाषण. तुमच्याकडे असलेला पैसा किंवा माध्यम याचाच परिणाम कि काय भाऊ लोखंडे सारखा तथाकतीत विचारवंतहि सुनील खोब्रागडे साठी हरभऱ्याच झाड घेऊन आलेला दिसत आहे. हा सुद्धा एक चमत्कारच म्हणावा लागेल. जोडे चाटनारी, जी हुजुरी करणारी संस्कृती मात्र तुम्ही आपल्या वृत्तपत्रातून छापू शकता पण तिसऱ्या आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष अमरावतीचे सतेश्वर मोरे तुमच्या संमेलनात " संविधानमूल्य आणि साहित्य " यावर जे काही बोलले ते मात्र छापण्याची तसदी तुम्ही घेतली नाही. म्हणजे 'घर कि मुर्गी दाल बराबर' असच महानायकच वागण समजायला हरकत नाही.
No comments:
Post a Comment