मा सुनील जी,
कांशीराम, मायावती च कुठलही प्रकरण आल कि जागच्या जागेवर उड्या मारायच्या अस आपल वागण दिसत. काल पर्यंत अण्णा हजारेंच्या तथाकतीत समितीविषयी तुम्ही साशंक होते. मायावतीन मागणी करताच तुम्ही हि अण्णा च्या समितीत दलितांच्या सहभागाची री ओढू लागले आहात. दलितांच्या साक्षीने तुम्हाला या देशाच्या लोकशाहीचा आराखडा बदलावयाचा आहे कि काय ? १९७७ ते १९८६ पर्यंतचे अंका च्या निमित्ताने तुम्हाला पुन्हा उडी मारण्याची संधी मिळाली. पण उड्या मारण्या पूर्वी थोडं हे सुद्धा तपासून पहा.
सुनील जी,
१९८४ मध्ये कांशीराम मधला राजकारणाचा किडा बाहेर आला व बसपा ची स्थापना झाली. त्यापूर्वी कांशीराम नावाचा राजकारणी डी .एस फोर सारखं सामाजिक संघटन चालवायचा. त्याच काळात दलित पैन्थर, दलित मुक्ती सेने सारखे सामाजिक आंदोलनही अस्तित्वात होतीच. विविध सामाजिक,राजकीय समस्यांच्या प्रश्नावर अश्या संघटनांच्या माध्यमातून आंदोलनही सुरु असायचे तसेच दलित साहित्य चळवळ, दलित रंगभूमी द्वारे समाजाच्या सांस्कृतिक गरजानाही न्याय मिळण्याला मदत होत असायची.१९८४ चा काळ असा होता कि आंबेडकरी समाज स्वताची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी, तथागताच्या आदर्शावर आपली वेगळी संस्कृती निर्माण करण्यासाठी संघर्षरत होता. अजूनही या समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक गरजा पूर्ण झाल्या नव्हत्या. बोरकर सारखी अनेक प्रवृत्ती या समाजात वावरत होती. दादासाहेब गायकवाडा पासूनच इथल्या व्यवस्थेने कॉंग्रेस च्या माध्यमातून रिपब्लिकन नावाच्या आंदोलनाला कुमकुवत करण्याचा प्रयत्न चालविला होता.१९८४ च्या काळातही कॉंग्रेस सारख्या पक्षांनी गवई, आठवले सारख्यांच्या मदतीने या समाजाला राजकीय पाठ शिकवण्याचे प्रयत्न सुरू ठेवलेत व या समाजाचा सामाजिक ढाचा नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला परंतु गायकवाड असो की गवई, आठवले असो, यांची जडण घडण मुळात सामाजिक आंदोलनातून झाल्यामुळे व् त्यांच्या मध्ये असलेल्या सामाजिक जाणीवेमुळे तसेच रिपब्लिकन पक्षाचा ढाचा फक्त राजकीय पक्ष नसून एक सामाजिक आंदोलनाचा असल्यामुळे, या समाजाचा सामाजिक ढाचा मात्र कॉंग्रेस सारख्या ब्राह्मणवाद्याना पूर्णपणे संपवता आला नाही पण अश्यातच एक चमत्कार घडला तो म्हणजे कांशीराम मधील राजकारणाचा किडा १९८४ मध्ये उजागर झाला व बी.एस.पी.ची स्थापना झाली. बोरकर प्रवृत्तीच्या हौशी कलावंताना एक वेगळं प्लेटफार्म मिळालं. हौश्या-नौश्यांचा पाठींबा मिळवत कांशीराम ने गोबेल्स च तंत्रज्ञान वापरीत बाबासाहेबांच्या एकाच विधानाचा प्रचार आपल्या पद्धतीने केला व येनकेन प्रकारे इथल्या माणसाला फक्त राजकीय पाठ शिकवणे सुरु केले. या समाजातील प्रत्येक माणसात राजकीय स्पर्धा सुरु केली. बाबासाहेबांच्या विधानाचा उपभोग घेत असताना बाबासाहेबांना कुठल्या आदर्शांवर राजकारण अपेक्षित होतं याची चर्चा मात्र कांशीराम किंवा आज मायावती करताना दिसत नाही. आंबेडकरी समाजावर कांशिरामच्या या कृतीचा दुष्परिणाम असा झाला कि अनपढ माणसाच्या ......त असलेला राजकारणाचा किडा समाजाच्या संवेदनावर, नितीमत्तेवर, आदर्शावर वरचढ झाला व आंबेडकरी समाजाचा सामाजिक ढाचा पूर्णपणे बदलून गेला जे गवई, आठवले च्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेला कधी हि करता आल नाही. आज आंबेडकरी समाजाचं चित्र बघून आपण एवढ्या निष्कर्षा पर्यंत येवून पोहचतो कि एखाद्या समाजाला सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या संपवायचं असेल तर त्या समाजातील प्रत्येक माणसाला फक्त वर्तमान भारतीय राजकारण शिकवल कि झालं. भाऊ लोखंडे च्या मुखातून जोडे चाटना-या संस्कृतीच उद्दातीकरण करणे व ते तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रात छापून आणने याच उत्तम उदाहरण आहे. याला असही म्हणता येईल कि, "अर्ध्या हळकंदात पिवळ होण" . असं करण्यामुळे कुठल्या आंबेडकरी सांस्कृतिक मूल्यांच जतन झालं, होत आहे हे आपण तपासलं पाहिजे. आणि अश्या हौश्या नौश्या ला हाताशी घेवून तुम्ही संविधानिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तो सुद्धा चमत्कारच म्हणावा लागेल. हौश्या नौश्या च आणखी उदाहरण देतोच म्हटल तर सुरवातीला बसपा वाले आपल्या सभामधून एक गाणं म्हणायचे ते म्हणजे, ' ये कैसी तेरी जिंदगी बहुजन मेरे भाई'. बिचारा गद्दर! गाणं बनवीत असताना त्याने आपल्या गाण्या सोबत असा काही खिलवाड होईल असं स्वप्नातही बघितल नसेल.म्हणजेच, राजकारणासाठी एखाद्या चांगल्या गोष्टीचा कसा सत्यानाश करायचा हे बसपा वाल्याकडून शिकण्यासारखे असते हे वरच्या ओळीतून स्पष्ट होते.
मा.सुनील खोब्रागडे जी, अतिमहत्वकान्क्षेपायी, प्रसिद्धीसाठी व शेवटी राजकारणासाठी तुम्ही सुद्धा साहित्य, सांस्कृतिक चळवळीसोबत असच काही करताना दिसत आहात पण आंबेडकरी चळवळीतील सुज्ञ माणूस हे सगळ जाणतो. पैश्याच्या बळावर आपण काहीही करू शकतो असा जर आपला गैरसमज झाला असेल तर तो कृपया काढून टाका.समाज, काळ आणि चळवळ अत्यंत गाम्भिर्याने समजून घ्या आणि मगच काय तो निर्णय घ्या नाहीतर उबाळे, खोब्रागडे बावाजी, पाटील, खापर्डे, वैद्य आणि शेवटी सत्ता असूनही "बहुजन नायकाचे " काय झाले ? याचा विचार करा.