Monday, February 28, 2011

prof. sateshwar more

प्रा.सतेश्वर मोरे यांनी आयु सुनील खोब्रागडे यांना मराठी साहित्य सभेविषयी लिहलेले पत्र , 
आयु. सुनीलजी,
आपले विचार वाचले, एक नवी सांस्कृतिक प्रक्रिया आपण गतिशील करीत आहात याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! मुळात आपण प्रतिक्रियावादी नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. कोणताही विचार किंवा प्रवाह काळाशी सुसंगत असण्यासाठी त्याची कालोचीतता अधिक नेमकेपणाने अधोरेखित करणे गरजेचे असते. आपण मराठी साहित्यासभा हा एक पर्याय सूचित केला. या सगळ्या प्रवाहाना एकत्रितपणे बांधण्यासाठी तो पुरेसा ठरेल यात शंकाच नाही. पण त्यांना केवळ एकत्रित बांधणे एवढेच पुरेसे नाही, कारण यातून त्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायमच राहील, नव्हे ते त्या प्रवाहांमध्ये कार्यरत असणारया कार्यकर्त्यांसाठी कायम असणे गरजेचे असते. कारण त्यातच त्यांचे अस्तित्व आणि सामाजिक ओळख निहित असते. म्हणून आपला प्रवाह टिकावा यासाठीच त्यांचे प्रयत्न कायम सुरु राहतील. ते प्रवाह कायम टिकले तरी आपला तोटा काय? उलट ते वेगवेगळे असले तरी त्या त्या विचाराचे प्रवाह या सभेच्या माध्यमातून आपल्या सोबतच असतील, त्यामुळे आपले बळ वाढेल. असा विचार आपण करू शकतो. पण असा विचार करणे तत्विकता बरोबर आहे काय? अजिबात नाही ही तात्त्विक तडजोड ठरेल. आणि अशा तडजोडीतून आपल्या हाती फारसे काही लाभत नाही हे एक आणि दुसरे असे की, राजकीय संदर्भात ह्या तडजोडी बरोबर असल्यातरी सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भात त्या टाळणे गरजेचे असते कारण यातूनच पुढे संस्कार आणि संस्कृतीच नव्हे, तर पुढच्या चळवळी गतिशील होत असतात. म्हणून या संदर्भात विचार करताना आपण अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे असे मला वाटते. आतापर्यत विदर्भात (दुसरीकडे शक्य झाले नाही म्हणून किंवा विदर्भाबाहेर त्याची दखल घेतली गेली नाही म्हणून) दहा अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलनाची आयोजने झाली. वामनदादा हे १९९३ मध्ये संपन्न झालेल्या वर्धेच्या पहिल्या अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते; आणि त्या नंतर अरुण कांबळे , बाबुराव बागुल. यशवंत मनोहर , लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, शरणकुमार लिंबाळे, गंगाधर पानतावणे, उत्तम कांबळे आणि रावसाहेब कसबे या सगळ्या मान्यवरांनी या संमेलनाची अध्य्क्षस्थाने भूषविली आहेत. अर्थात यांनी आंबेडकरी साहित्य ही संज्ञा मान्य केली, असून तोच भारतीय साहित्याचा मुख्य प्रवाह आहे असे प्रतिपादन केले ; आणि सगळ्या साहित्य प्रवाहांची या प्रवाहाशी आपली नाळ जोडली गेली आहे असे स्पष्टपणे जाहीर केले. मी हे यासाठी सांगतो आहे की, आपण जेव्हा एखादी संकल्पना किंवा व्यवस्था नाकारतो. तेव्हा कालोचीत अशी व्यापक नवी पर्यायी व्यवस्था देणे गरजेचे असते. गेल्या १९९३ नव्हे तर १९८३ पासूनच हा विचार पुढे आला होता तो ९३ पासून प्रत्यक्षात आला आणि गेल्या २१ सप्टेंबर २००८ मध्ये ही संमेलन ज्या संस्थांनी आयोजीत केली होती त्या सगळ्या संस्थांच्या अध्यक्ष आणि सचिव अशा प्रत्येकी दोन प्रतिनिधींची बैठक अमरावतीला संपन्न झाली. त्यात या संमेलनाची सुसंगतता आणि त्याची आयोजने नियमित व्हावी आणि सांस्कृतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थांचे त्यासाठी एकसंघ असणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन एका अ.भा.आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाची स्थापना करण्यात आली. हे महामंडळ संस्थांचा संघ म्हणून काम करेल त्याच्या संस्था सभासद असतील आणि त्या संस्थांचे दोन प्रतिनिधी या महामंडळाच्या आमसभेला निमंत्रित असतील. ह्या महामंडळाची अजून नोंदणी झाली नाही. अशाप्रकारे ही प्रक्रिया गतिशील असून अमरावतीचे संमेलन हे महामंडळाचे स्थानिक संस्था आशय ने आयोजित केले होते. याच महामंडळाच्या वतीने दोन आंबेडकरी विद्यार्थी साहित्य संमेलने आणि तीन आंबेडकरी युवा साहित्य संमेलने आयोजित केली नुकतेच वर्धेला तिसरे युवा संमेलन आयोजित केले होते. ही प्रक्रिया अधिक व्यापक होणे गरजेचे आहे. ज्यातून पुढे नागपूर सारखे प्रकरण होणार नाही मुळात सगळेच आपापले तंबू साभाळत आहे. जोपारायात आपला प्रवाह व्यापक होणार नाही तोपर्यंत त्यांचे तंबू सांभाळणे थांबणार नाही. असे असले तरी केवळ आपण त्यांच्या तंबुंचाच विचार करीत नाहीतर आंबेडकरी विचार हा सार्वभौम आणि सर्वव्यापी असा विचार आहे ज्यात सगळेच विचार प्रवाह समाविष्ट आहे आपण आंबेडकरी असणे म्हणजे फुलेवादी असणे शाहुवादी असणे सगळ्या ग्रामीण पुरोगामी विचाराचे आपण पायिक असणे, हे जर मान्य केले तर आंबेडकरी साहित्य आणि विचार हाच सर्वव्यापी साहित्य विचार आहे हे मान्य करणे गरजेचे आहे. हेच अधिक कालोचित आहे असे मला वाटते कारण जेव्हा आपण दलित साहित्य ही संज्ञा प्रस्थापित केली त्यावेळी नामदेव कांबळे सारखा संघाचा माणूस केवळ दलित जातीत जन्माला आला म्हणून दलित साहित्यिक झाला होता असे घोटाळे आता आपण टाळले पाहिजे आणि अधिक विचाराशी सुसंगत झालो पाहिजे. म्हणूनच आंबेडकरी ही संज्ञा अधिक कालसंगत आहे असे माझे मत आहे. आपण आता हा नवा प्रवाह गतिशील करीत आहात. आपणास शक्य असेल तर या सभेला अ. भा. आंबेडकरी मराठी साहित्य महासभा आणि जे संमेलन आपण मार्चमध्ये भरवत आहात त्या संमेलनाला आंबेडकरी मराठी महासभेचे अकरावे अ.भा. आंबेडकरी साहित्य संमेलन असे नाव द्यावे. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. आणि यातून आपण अधिक व्यापक व तेवढेच अधिक विचारशील होत आहोत हे लक्षात घ्या! कारण आंबेडकरी विचार, आंबेडकरी संस्कृती, आंबेडकरी संस्कार, आणि आंबेडकरी माणूस म्हणूनच जगात आपली स्वतंत्र आणि स्वायत ओळख आहे हे लक्षात घ्या. ही आपली ओळख आपल्या सांस्कृतिक आयोजनातून अधिक स्पष्ट आणि स्वच्छ व्हावी एवढीच अपेक्षा! 
जयभीम 
सतेश्वर मोरे 
sateshwarmorey@gmail.com

bhalchandra mungekar

आयु. मुणगेकर सर,
बाबासाहेबांनी दिलेल्या आर. पी. आय. ला डावलून स्वताच्या स्वार्थासाठी कॉंग्रेसी सत्तेत सहभाग मागून बहुजनांचे प्रश्न सुटणार का ? मुणगेकर सर, रिपब्लीकन पक्ष आपला बाप आहे व रिपब्लीकन जनता आपली आई आहे तेव्हा आपला बाप जर बिघडला तर त्याला दुरुस्त करण्यातच तुमची माझी मर्दानगी असणार, पण बाप बिघडला म्हणून आपल्या आईला म्हणण कि तू बाजुवाल्याला बाप बनव म्हणजे कॉंग्रेस, राष्ट्रवादी, बसपा वगेरे वगेरे तेव्हा याला काय म्हनाव? मला वाटते आपण आपली बुद्धी दिशाहीन झालेल्या रीपब्लीकन नेत्यांना मार्गावर आणण्याकरिता वापरावी, तुम्हाला यश निशचीतच येणार. स्वताच्या सोयीसाठी कॉंग्रेस मध्ये सहभागाचा संदेश देवू नये.

Saturday, February 26, 2011

marathi sahitya sangiti

आयु. सुनील खोब्रागडे सर
आपल्या साहित्य विश्वात एकच प्रवाह आहे तो म्हणजे " आंबेडकरी साहित्य ". आजपर्यंत अकरा अ भा दलित साहित्य संमेलन झालीत व त्यानंतर पंधरा आंबेडकरी साहित्य संमेलन झालीत.     सर्व संमेलनाच प्रेरणास्त्रोत बाबासाहेब आंबेडकरच आहेत. या पन्नास वर्षात कुणीही मराठी साहित्य संमेलनाचा ध्यास पकडला नाही. प्रस्थापितांच्या मराठी साहित्य विश्वाला पर्याय म्हणून सुरवातीला दलित व नंतर आंबेडकरी असं साहित्य विश्व निर्माण केल.
खोब्रागडे सर, तुम्ही उंदीर खावून जगलेत, आठव्या वर्गात असताना तुम्ही पहिल्यांदा पायात चप्पल घातली हाच विषय आपल्या साहित्य निर्मितीचा गाभा होता. पण असं दिसते कि असे लोक पैसेवाले झाले व सभोवताल चार लाभार्थी जमा झाले कि लगेच आपल नवं  दुकान सुरु करतात व बहुजन, सर्वजनाची स्वप्नही पडायला लागतात आणि हे सर्व कपड्यांची क्रीझ मेंटेन करून करतात. त्यातलाच तुमचा मराठी साहित्य सभेचा उपद्रव दिसतो. तुम्ही आयोजित करीत असलेल संमेलन सर्वजनपदी असल्याच घोषित करून मायावती साठी महाराष्ट्रात जमीन तयार करण्याची तुमची मानसिकता सुद्धा सिद्ध झालेली आहे. 
महाकवी वामनदादा कर्डक यांची एक गोष्ट सांगतो, १९९३ ला पहिल्या अ भा आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्वताविषयी फार अभिमानाने एक वाक्य उदगारल होत ते म्हणजे " मी फकीर आहे पण आंबेडकरवादी " तेव्हा खोब्रागडे सर तुमच्याकडे तर चार पैसे आलेत तर मग तुम्हाला स्वताला किंवा संमेलनाला आंबेडकरी म्हणवून घेण्यास कुठली अडचण येत आहे? म्हणजे येनकेन प्रकारे बहुजन,सर्वजन व शेवटी याच राजकारण असच न ! आणि असच आहे तेव्हा ओशो रजनीश, बसपा च उत्कृष्ट मिश्रण असलेले भाऊ लोखंडे तुमच्या संमेलनाचे अध्यक्ष होत असतील तर नवल कसलं ? 
मायावतीन बाबासाहेबाच्या हत्तीचा गणेश केला, तुम्ही आता साहित्याचा ज्ञानेश्वर करायला निघालेत. हा उपद्रव बाबासाहेबांच्या २२ प्रतीज्ञांशी तडजोड नाही का ? 
अधिकाऱ्यांची, उद्योगपतींची विना अनुभवाने आंदोलनात डायरेक्ट एन्ट्री झाली कि असे प्रदूषण येणारच.