Monday, April 25, 2011

political bazar: मा सुनील जी, हे सुद्धा तपासून पहा

political bazar: मा सुनील जी, हे सुद्धा तपासून पहा

मा सुनील जी, हे सुद्धा तपासून पहा

मा सुनील जी,
कांशीराम, मायावती च कुठलही प्रकरण आल कि जागच्या जागेवर उड्या मारायच्या अस आपल वागण दिसत. काल पर्यंत अण्णा हजारेंच्या तथाकतीत समितीविषयी तुम्ही साशंक होते. मायावतीन मागणी करताच तुम्ही हि अण्णा च्या समितीत दलितांच्या सहभागाची री ओढू लागले आहात. दलितांच्या साक्षीने तुम्हाला या देशाच्या लोकशाहीचा आराखडा बदलावयाचा आहे कि काय ? १९७७ ते १९८६ पर्यंतचे अंका च्या निमित्ताने तुम्हाला पुन्हा उडी मारण्याची संधी मिळाली. पण उड्या मारण्या पूर्वी थोडं हे सुद्धा तपासून पहा.     
सुनील जी,
१९८४ मध्ये कांशीराम मधला राजकारणाचा किडा बाहेर आला व बसपा ची स्थापना झाली. त्यापूर्वी  कांशीराम नावाचा राजकारणी डी .एस फोर सारखं सामाजिक संघटन चालवायचा. त्याच काळात दलित पैन्थर, दलित मुक्ती सेने सारखे सामाजिक आंदोलनही अस्तित्वात होतीच. विविध सामाजिक,राजकीय समस्यांच्या प्रश्नावर अश्या संघटनांच्या माध्यमातून आंदोलनही सुरु असायचे तसेच दलित साहित्य चळवळ, दलित रंगभूमी द्वारे समाजाच्या सांस्कृतिक गरजानाही न्याय मिळण्याला मदत होत असायची.१९८४ चा काळ असा होता कि आंबेडकरी समाज स्वताची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी, तथागताच्या आदर्शावर आपली वेगळी संस्कृती निर्माण करण्यासाठी संघर्षरत होता. अजूनही या समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक गरजा पूर्ण झाल्या नव्हत्या. बोरकर सारखी अनेक प्रवृत्ती या समाजात वावरत होती. दादासाहेब गायकवाडा पासूनच इथल्या व्यवस्थेने कॉंग्रेस च्या माध्यमातून रिपब्लिकन नावाच्या आंदोलनाला कुमकुवत करण्याचा प्रयत्न चालविला होता.१९८४ च्या काळातही कॉंग्रेस सारख्या पक्षांनी गवई, आठवले सारख्यांच्या मदतीने या समाजाला राजकीय पाठ शिकवण्याचे प्रयत्न सुरू ठेवलेत व या समाजाचा सामाजिक ढाचा नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला परंतु गायकवाड असो की गवई, आठवले असो, यांची जडण घडण मुळात सामाजिक आंदोलनातून झाल्यामुळे व्  त्यांच्या मध्ये असलेल्या सामाजिक जाणीवेमुळे तसेच रिपब्लिकन पक्षाचा ढाचा फक्त राजकीय पक्ष नसून एक सामाजिक आंदोलनाचा असल्यामुळे, या समाजाचा सामाजिक ढाचा मात्र कॉंग्रेस सारख्या ब्राह्मणवाद्याना पूर्णपणे संपवता आला नाही पण अश्यातच एक चमत्कार घडला तो म्हणजे कांशीराम मधील राजकारणाचा किडा १९८४ मध्ये उजागर झाला व बी.एस.पी.ची स्थापना झाली. बोरकर प्रवृत्तीच्या हौशी कलावंताना एक वेगळं प्लेटफार्म मिळालं. हौश्या-नौश्यांचा पाठींबा मिळवत कांशीराम ने गोबेल्स च तंत्रज्ञान वापरीत बाबासाहेबांच्या एकाच विधानाचा प्रचार आपल्या पद्धतीने केला व येनकेन प्रकारे इथल्या माणसाला फक्त राजकीय पाठ शिकवणे सुरु केले. या समाजातील प्रत्येक माणसात राजकीय स्पर्धा सुरु केली. बाबासाहेबांच्या विधानाचा उपभोग घेत असताना बाबासाहेबांना कुठल्या आदर्शांवर राजकारण अपेक्षित होतं याची चर्चा मात्र कांशीराम किंवा आज मायावती करताना दिसत नाही. आंबेडकरी समाजावर कांशिरामच्या  या कृतीचा दुष्परिणाम असा झाला कि अनपढ माणसाच्या ......त असलेला राजकारणाचा किडा समाजाच्या संवेदनावर, नितीमत्तेवर, आदर्शावर वरचढ झाला व आंबेडकरी समाजाचा सामाजिक ढाचा पूर्णपणे बदलून गेला जे गवई, आठवले च्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेला कधी हि करता आल नाही. आज आंबेडकरी समाजाचं चित्र बघून आपण एवढ्या निष्कर्षा पर्यंत येवून पोहचतो कि एखाद्या समाजाला सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या संपवायचं असेल तर त्या समाजातील प्रत्येक माणसाला फक्त वर्तमान भारतीय राजकारण शिकवल कि झालं.  भाऊ लोखंडे च्या मुखातून जोडे चाटना-या संस्कृतीच उद्दातीकरण करणे व ते तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रात छापून आणने याच उत्तम उदाहरण आहे. याला असही म्हणता येईल कि, "अर्ध्या हळकंदात पिवळ होण" . असं करण्यामुळे  कुठल्या आंबेडकरी सांस्कृतिक मूल्यांच जतन झालं, होत आहे हे आपण तपासलं पाहिजे. आणि अश्या हौश्या नौश्या ला हाताशी घेवून तुम्ही संविधानिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तो सुद्धा चमत्कारच म्हणावा लागेल. हौश्या नौश्या च आणखी उदाहरण देतोच म्हटल तर सुरवातीला बसपा वाले आपल्या सभामधून एक गाणं म्हणायचे ते म्हणजे, ' ये कैसी तेरी जिंदगी बहुजन मेरे भाई'. बिचारा गद्दर! गाणं बनवीत असताना त्याने आपल्या गाण्या सोबत असा काही खिलवाड होईल असं स्वप्नातही बघितल नसेल.म्हणजेच, राजकारणासाठी एखाद्या चांगल्या गोष्टीचा कसा सत्यानाश करायचा हे बसपा वाल्याकडून शिकण्यासारखे असते हे वरच्या ओळीतून स्पष्ट होते.
मा.सुनील खोब्रागडे जी, अतिमहत्वकान्क्षेपायी, प्रसिद्धीसाठी व शेवटी राजकारणासाठी तुम्ही सुद्धा साहित्य, सांस्कृतिक चळवळीसोबत असच काही करताना दिसत आहात पण आंबेडकरी चळवळीतील सुज्ञ माणूस हे सगळ जाणतो. पैश्याच्या बळावर आपण काहीही करू शकतो असा जर आपला गैरसमज झाला असेल तर तो कृपया काढून टाका.समाज, काळ आणि चळवळ अत्यंत गाम्भिर्याने समजून घ्या आणि मगच काय तो निर्णय घ्या नाहीतर उबाळे, खोब्रागडे बावाजी, पाटील, खापर्डे, वैद्य आणि शेवटी सत्ता असूनही "बहुजन नायकाचे " काय झाले ? याचा विचार करा. 

Wednesday, April 13, 2011

anna hajare

अन्ना,
१० अप्रैल, रात १० बजे  IBN  न्यूज़ चैनल पर आपका interview सुना ! राजदीप ने चुनाव लढने के बारे में आपको सवाल पूछा, आपने जवाब दिया की यहाँ का मतदार जागृत नहीं होने की वजह से  मै अगर चुनाव लढ़ भी लू तो मेरी जमानत जप्त हो जाएगी ! आप जमानत जप्त होने की बारे में जितने शास्वत दिखे उतने ही यहाँ का मतदार जागृत नहीं होने के बारे में भी शास्वत दिखे ! ऐसे ही मतदार के बीच  भ्रष्टाचार को लेकर आपने एक जंग छेड़ी इसलिए आपकी जितनी तारीफ करो उतनी कम है लेकिन इस जंग की आपकी लढाई देखकर कई सवाल खड़े होते नजर आ रहे है ! मान लो आनेवाले दिनों में इस भारत में भाजपा की सरकार आती है और ऐसे ही सोये हुए मतदारो को साथ लेकर यही रास्ता यहाँ के साम्प्रदायिक ताकतोने राम मंदिर बनाने के लिए अख्तियार किया और संसद के पाच और समाज सेवक पाच तो उस वक्त  इस देश की हालत क्या होगी इस बारे में थोडा आपने सोचा होता तो बेहतर होता ! राम मंदिर के आन्दोलन में समाज सेवक पाच और सरकार के पाच कौन होगे यह तो आपको समजता ही होगा और इतनी समज आपको होनी भी चाहिए ! इस देश का चित्र क्या होगा यह सोचने की जरूरत है ! 
अन्ना , भ्रष्टाचार के साथ ही इस देश में कई बड़ी समस्या है, जातिवाद , दलितों पर अत्याचार, आदि. जब किसी दलित को जिन्दा जलाया जाता है, किसी नारी पर सरे आम बलात्कार किया जाता हो, उस वक्त यहाँ का कोई अन्ना , मिडिया , या कोई समाजसेवक इतना जागृत नहीं दीखता ! आपके ही महाराष्ट्र में खैरलांजी का हत्याकांड हुआ ! आज भ्रष्टाचार के मुद्दे पर आप के साथ जितने लोग सड़क पर उतरे उससे पाच गुना लोग बलात्कारी को सजा देने की लिए सड़क पर सात दिन अपना आन्दोलन  करते रहे ! उस वक्त यहाँ के समाज सेवक , मिडिया , और आप की देशभक्ति कहा थी ? यह सवाल आज खड़ा हो रहा है ! फिर आपके के पीछे ऐसे कौन लोग है जो अचानक से सोये हुए लोगो में , मिडिया में इतनी देशभक्ति का निर्माण किया ? आप ने अपने मंडप में माता की तस्वीर लगा रखी थी जिस की भारत की संविधान में कही जगह नहीं, साथ ही आपके आन्दोलन कारी अनुपम खेर संविधान को उखाड फेकने की बात करते है और आप के लोग अनुपम खेर के साथ होने की बात करते है उस वक्त ऐसे सोचने के लिए मजबूर होना पड़ता है की इस आन्दोलन की बागडोर आप के हाथ में नहीं है ! आप को सिर्फ एक मोहरा बनाकर पेश किया जा रहा है ! भ्रष्टाचार इस देश से ख़त्म हो ऐसा हर नागरिक को लगता है ! लेकिन संविधानिक तरीके से इसका निर्मूलन होना चाहिए ! सरकार के नुमायिंदे तो संविधानिक तरीके से चुने हुए होते है लेकिन समाज सेवक को चुनने का संविधानिक तरीका क्या होगा ? फिर चार लोगो ने सोये हुए मतदारो को साथ लेकर किसी बात के लिए आन्दोलन छेड़ा और मिडिया को किराये पर लेकर सरकार पर दबाव बनाया उस वक्त पाच समाज सेवक उनके ही होगे !क्या यह बात संविधानिक होगी ? 
अन्ना , गाँधी जयंती के अवसरपर मरीज को सेफ , अंगूर खिलानेसे इस देश का भ्रष्टाचार ख़त्म होनेवाला नहीं ! उस मरीज को सेफ और अंगूर कमाने के लायक बनाना होगा ! गांधीजी ने समाज सेवा को महत्व दिया था तो डा आंबेडकर ने समाज के परिवर्तन को जरुरी समजा था !

Friday, April 8, 2011

sahitya sangiti

आयु. सुनील खोब्रागडे जी,
दि. ३ व ४ एप्रिल २०११ रोजी तुमच्या अ. भा.मराठी साहित्य महासभेने  आयोजित केलेल्या  अ. भा. मराठी  साहित्य संगीती चे अध्यक्ष भाऊ लोखंडे याचं भाषण आपल्या महानायक मधून प्रकाशीत झाले.  सोबतच भाऊ लोखंडे च्या भाषणाचा सार सुद्धा महानायक  मधून वाचायला मिळाला. या संगीतीच्या अध्यक्ष पदावरून बोलताना भाऊ लोखंडे बोललेत कि ' ज्या राज्यात अस्पृश्यांना स्वाभिमानाने जगता येत न्हवते, आज त्या राज्याच्या एका चांभार महिलेच्या जोड्याला चुम्बताना ब्राह्मणांना बघत आहोत ' हा चमत्कार नाही का ? असे असताना आजही सत्ताधाऱ्यांच्या मनातील जातीवाद गेला नाही'. भाऊच्या वरील वाक्यात महानायक ला संविधानिक मूल्य सापडलेत हा सुद्धा एक चमत्कार दिसतो आहे. मायावती मुख्यमंत्री आहे म्हणून ब्राह्मण  जोडे चुम्ब्तात किंवा  मायावती चांभाराची पोरगी आहे म्हणून तिचे जोडे चुंबत असतील, शेवटी प्रश्न निर्माण होतो तो जोडे चुम्ब्ण्याचा. एखाद्या मुख्य मंत्र्याची जात सांगण्याचा अधिकार तेहि जोड्याच चुंबन घेण्याच्या संदर्भात संविधानाच्या कुठल्या कलमात येतो याचा उल्लेख मात्र महानायक किंवा भाऊनी केला नाही. 
  पण सुनील जी असही असू शकते कि यु पी तले ब्राह्मण मायावतीकडून ब्रह्मा विष्णूचा नारा लावून घेतात आणि  मिश्रा नावाच्या ब्राम्हणाला  बसपा च्या मंचावरून जय परशुराम चा नारा लावण्याची संधी देतात  म्हणून ब्राम्हण तिचे जोडे चुंबत असतील तरी सुद्धा शेवटी प्रश्न एकच उरतो तो म्हणजे " जोडे चुम्बण्याचा ". त्यासाठी बसपा वाल्यांना एवढ पिवळ होण्याची गरज काय? हि बाब किती संविधानिक आहे हे तुमच्या सारख्या प्रशासकीय अधिकारी राहलेल्या माणसाला कळू नये याला ' चमत्कार ' म्हणायचं कि ' राजकारण ' हे तुम्हीच ठरवावं पण राजकीय उद्देश मनाशी बाळगून संविधानिक मुल्यांवर साहित्य निर्मिती अशी जी काही  मजाकबाजी तुम्ही सुरु केली ती मात्र निंदनीय आहे. या नंतर कोणत्याही रिपब्लिकन नेत्याला शिवा देण्याचा संविधानिक अधिकार जरी तुमच्याकडे असेल पण नैतिक अधिकार तुम्हाला आहे असे मला वाटत नाही. फक्त मायावती चार वेळा मुख्यमंत्री झाली म्हणून, किंवा खोब्रागडे न वृत्तपत्र सुरु केल म्हणून किंवा महानायक चळवळीतल्या माणसांना हजारो रुपयांचे पुरस्कार देतो म्हणून बसपा वाल्यांना शिवी देण्याचा अधिकार प्राप्त झाला असा जर कुणाचा गैरसमज होत असेल किंवा झाला असेल तर त्या माणसांनी अजून आंबेडकरी आंदोलन समजून घेण्याची आवश्यकता नक्कीच आहे. 
       सुनीलजी, बाबासाहेबांच्या काळात पैसेवाले लोक त्यांच्या पाठीशी उभे राहत. त्या नंतरच्याही काळात  पैसेवाले लोक विचारवंतांच्या, कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून चळवळीला पाठींबा देत असायचे.  पण कांशीराम नावाच्या बिमारीपासून समाजातील, चळवळीतील  नितीनियमच लयास गेल्याचे निदर्शनास येत आहेत. चळवळी मध्ये दिवसेंदिवस चमत्कारच होत आहेत. याच नुकतच चांगल उदाहरण म्हणजे तुमच्या साहित्य संगीतीच  अध्यक्षीय भाषण. तुमच्याकडे असलेला पैसा किंवा माध्यम याचाच परिणाम कि काय भाऊ लोखंडे सारखा तथाकतीत विचारवंतहि सुनील खोब्रागडे साठी हरभऱ्याच झाड घेऊन आलेला दिसत आहे. हा सुद्धा एक चमत्कारच म्हणावा लागेल. जोडे चाटनारी, जी हुजुरी करणारी संस्कृती मात्र तुम्ही आपल्या वृत्तपत्रातून छापू शकता पण तिसऱ्या आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष अमरावतीचे सतेश्वर मोरे तुमच्या संमेलनात " संविधानमूल्य आणि साहित्य " यावर जे काही बोलले ते मात्र छापण्याची तसदी तुम्ही घेतली नाही. म्हणजे 'घर कि मुर्गी दाल बराबर' असच महानायकच वागण समजायला हरकत नाही.