Thursday, March 31, 2011

मा. निखील वागलेजी,
काही लोकं फटाके फोडून आपल्या देशभक्तीचा परिचय देत असतात. काल भारताने पाकिस्तान सोबतचा क्रिकेट सामना जिंकला व भारतामध्ये पुन्हा फटाक्यांची आतिषबाजी झाली. या पूर्वीही भारत-पाकिस्तान सामन्या  दरम्यान भारताच्या विजयावर अनेकदा फटाक्यांची आतिषबाजी बघायला मिळाली परंतु पाकिस्तान सोडून इतर देशासोबत भारत विजयी झाला तेव्हा मात्र फटाक्यांची आतिषबाजी करून देशभक्ती चा परिचय देणारे फार कमी उदाहरण दिसतात तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो कि खरच भारताने क्रिकेट सामना जिंकला म्हणून फटाके फुटतात कि पाकिस्तान भारतासोबत सामना हरला म्हणून फटाके फुटत असतात ? आजही २१ व्या शतकात भारतीय माणूस देशभक्तीचा परिचय देताना कुणाच्या पराभवावर फटाके फोडत असेल तर याला जबाबदार कोण ? याचं विश्लेषण कधी होणार कि नाही ? क्रिकेट ला राजकारणाशी जोडू नये फक्त एवढ बोलून कस चालणार ?

Monday, March 14, 2011

मा.शरणकुमार लिंबाळे जी,
 अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण वाचले असता आपल्यावर रामदास आठवलेंचा विशेष प्रभाव जाणवतो. हे असे आहे, ते असे होते, हे असं करायला पाहिजे, ते तसं करायला पाहिजे वगेरे वगेरे, मात्र या साहित्याला आंबेडकरी साहित्य म्हणावं या करिता तुम्ही आपला ' पाहिजे ' खर्च करण्याचं बुद्धीपुरस्पर टाळलेल आहे. परंतु आंबेडकरी आंदोलनाशी कुठलही  नातं नसलेल्या यशवंतराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे सारख्यांचा उल्लेख करून स्वतासाठी चोर दरवाजे शोधण्याचा प्रयत्न केला. तुम्ही हे असं करायला न्हवत  पाहिजे.