Tuesday, December 24, 2013

जग बदलत आहे, जगासोबत आम्ही पण बदलतो आहोत.  पूर्वी मोहोल्ल्यात पंचशीलेच्या झेंड्या जवळ एकत्र येवून झेंड्याच्या साक्षीने चळवळीची दिशा दशा चर्चिल्या जायची. कालांतराने झेंड्याची जागा चौकातील पानटपरी ने घेतली. गावातील झेंड्या झेंड्या वरची दोन चार दोन चार मानसं टपरी वर नामांतराच्या आंदोलनाचे आपआपले अनुभव शेयर करायचे. तेव्हा पर्यंत आपापसातील बंधुभाव टिकून होता. आज माणूस एकलकोंडा झाला आहे. टपरीची जागा फेसबुक ने घेतली आहे. आपल्या राजकीय पक्षाकडे मुद्दे राहले नाहीत व रस्त्यावर येण्याची कुवतही राहली नाही. स्वत:ला चार भिंतीच्या आत कोंडून फेसबुक चौकात गप्पा हाकलणे सुरु झाले. इंटरनेट वर चर्चा व्यापक होणार,चळवळीच नातं जगाशी जुळनार यात शंका नाही पण शेजाऱ्याशी आपला बंधुभाव मात्र नाहीसा झाला आहे .त्याचे काय? काल टपरीवर एकाने प्रश्न केला की आंबेडकरी म्हणवून घेणाऱ्या राजकीय पक्षांच्या अजेंड्या वर पुढील दहा वर्षात सामाजिक स्तरावरचे  कोणतेही दोन धोरणात्मक असे मुद्दे दाखवावे की ज्या मुद्द्यांना घेवून हे पक्ष लढा देत राहतील व त्यामुळे आंबेडकरी आंदोलनाला मजबुती प्राप्त होईल. फेसबुक चौकात याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास एक सारखेच सामाजिक ? मुद्दे सापडतात  कि मायावतीला पंतप्रधान बनवायचे आहे, आठवलेंना राज्यसभेवर पाठवायचे आहे वगेरे वगेरे … .
 जनता एकत्रीकरणासाठी वारंवार आपला संताप व्यक्त करीत आहे पण नेमक काय कराव कुणाला कळत नाही.वारंवार सांगून जर कोणी ऐकत नसेल तर मानवी स्वभाव आहे कि वेळोवेळी सांगून ही पुढचा माणूस समजत नसेल तर समोरच्याच्या सरळ थोबाडात लावतो व समजवण्याचा प्रयत्न करतो. मला वाटते नेत्यांच्या थोबाडात लावून समजावण्याची वेळ आलेली आहे नाही तर पुढील पन्नास वर्षानंतर ही आपल्याला रिडल्स,खैरलांजी, देवयानी सारखा मुद्दा घडण्याचीच वाट पाहत रहाव लागणार आहे. 

अरविंद निकोसे

No comments: